शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शुक्रवारी चिपळुणात

चिपळूण : शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार हे चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी चिपळुणात येणार आहेत. गेले चार दिवस चिपळूण बचाव समितीच्यावतीने गाळ काढण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला विविध संघटना व संस्था, ग्रामपंचायती आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. नागरिकांच्या उपोषणाची दखल घेऊन शेट्टी हे दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी येणार आहेत. त्यांच्याबरोबर शेतकरी संघटनेचे इतर नेतेही येणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button