अस्तान ग्रा.पं.तील अपहार प्रकरणातील ग्रामसेवक फरार

खेड : अस्तान ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोग व ग्रामनिधीतील 8 लाख 24 हजार 730 रूपयांच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सरपंच दीपक मोरे (सणघर-खेड) याची जामिनावर सुटका झाली. या अपहारप्रकरणातील ग्रामसेवक शशिकांत शंकर जाधव (वीर-चिपळूण) फरार झाला आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. खेड तालुक्यातील अस्तान ग्रामपंचायतीत 14 व्या वित्त आयोग व ग्रामनिधीतून प्राप्त झालेली 8 लाखांची रक्कम परस्पर काढून अपहार केल्याप्रकरणी 30 ऑक्टोबर रोजी सरपंच दीपक मोरे व ग्रामसेवक शशिकांत जाधव यांच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
होता. 2017 ते 2020 या कालावधीत अपहार झाल्याचे ग्रामविस्तार अधिकारी शरद भांड यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास करत सरपंच दीपक मोरे याला अटक केली. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हर्षल हिंगे करत
आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button