
बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ापासून होण्याची शक्यता, त्यावेळी कोरोनाची स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाणार
राज्यात ओमायक्रोनचा धोका हळूहळू वाढत आहे. त्यामुळे येणाऱया काळात रुग्णसंख्या वाढल्यास दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा कशा होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ापासून होण्याची शक्यता असून त्यावेळी कोरोनाची स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.तसेच आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शिक्षण मंडळाकडे मूल्यांकनाचा दुसरा फार्म्युलादेखील तयार असून सर्व पर्यायांची चाचपणी करूनच मंत्रालय स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे.
www.konkantoday.com