ओबीसी आरक्षण राज्य सरकारमुळे धोक्यात : बावकर

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा धोक्यात आले असून याला सर्वस्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकार व ओबीसी बहुजन कल्याणमंत्री जबाबदार आहेत असा घणाघात ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी केला आहे. राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा मिळविण्यासाठी येत्या दोन महिन्यात युध्दपातळीवर प्रयत्न न केल्यास त्याची किंमत महाविकास आघाडीला चुकवावी लागेल. एवढेच नाही तर या विषयाकडे राज्य शासनाने गांभिर्याने न पाहिल्यास आगामी निवडणूका होऊ देणार नाही, असा इशारा असा इशारा ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button