एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अद्याप सुरुच
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अद्याप सुरुच आहेत.आज या संपाला एक महिना पूर्ण झाला. प्रशासनानं दिलेल्या पगारवाढीच्या आश्वासनानंतरही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. ८ नोव्हेंबरला संपूर्ण राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि विलीनीकरण या दोन मुख्य मागण्यांसाठी एल्गार पुकारला. एसटी कर्मचाऱ्यांचा इतिहासातील पहिलाच दीर्घकालीन संप असल्याचं बोललं जातंय. एस.टी. महामंडळाच्या ६१वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासातील इतके दिवस चालणारं हे विक्रमी आंदोलन ठरलं आहे. आधीच तोट्यात असणाऱ्या महामंडळाला आंदोलनामुळे थोडा थोडका नाहीतर तब्बल ४५०कोटींहून अधिक फटका बसला.
www.konkantoday.com