खेड तालुक्यातील गुटखा प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन

खेड तालुक्यातील घाणेखुंट-गवळवाडी येथून दि. २ रोजी जप्त करण्यात आलेल्या गुटखा विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेला तैयब सत्तार मेमन याची पोलीस कसून चौकशी
करत आहेत. याप्रकरणी सहभाग असलेल्या चिपळुणातील पुजारी नामक इसम फरारीचा असून शोध सुरू आहे. मेमनकडून गुटखा खरेदी करणाऱ्या आणखी १७ जणांची येथील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

येथील पोलिसांनी ८ लाख ६ हजार रुपये किमतीचा किमतीचा गुटखा जप्त केला. अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये त्यामुळे खळबळ उडाली आहे. गवळवाडी येथे टाकण्यात आलेल्या धाडीत विविध प्रकारचे गुटखे जप्त करण्यात आले होते. हा गुटखा कर्नाटकातून येत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांना तैयब मेमन याच्याकडे मोठा साठा सापडल्याने पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button