लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलन स्थळी शाई फेकण्याचा धक्कादायक प्रकार
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलन स्थळी शाई फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजी ब्रिगेडनं ही शाईफेक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं असून ते दोघेही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.अशा प्रकारे शाईफेक करून भ्याड हल्ला करणं निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटू लागली आहे.
साहित्य संमेलनाचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. मात्र, शेवटच्या दिवशी साहित्य संमेलनाला गालबोट लागलं आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये गिरीश कुबेर यांच्यावर हा शाईहल्ला करण्यात आला आहे. संमेलन स्थळी गिरीश कुबेर दाखल होत असताना हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे शेवटच्या दिवशी संमेलनाला गालबोट लागल्याचं दिसून आलं आहे.
www.konkantoday.com