
पश्चिम बंगालमधून बहीण आल्यासारखं होतं असं म्हणत सामनाने पुन्हा एकदा ममतांच्या दौऱ्यांचं समर्थन केल
ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून मोठं राजकीय घमासान झालं. त्यानंतर आज शिवसेनेचं मुखपत्र सामनातून याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. ममता बॅनर्जी आता मुंबईचे उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाणार असा आरोप भाजपने केला होता. त्यांच्या या आरोपाचा सामनामध्ये चांगलाच समाचार घेण्यात आलाय.
ममता बॅनर्जी यांचं मुंबईत येणं हे इथल्या लोकांना सुखावणारं होतं. त्यांनी इथे उद्योजकांची भेट घेतली व विनम्रपणे त्यांना पश्चिम बंगालमध्ये येण्याची विनंती केली. मात्र गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यासारखं महाराष्ट्रात काय ठेवलंय? असं त्या म्हटल्या नसल्याची खोचक टीका सामनामधून करण्यात आली. ममता बॅनर्जी यांनी मुंबईच्या विकासाचे कौतूक केलं. त्यांचं येणं म्हणजे पश्चिम बंगालमधून बहीण आल्यासारखं होतं असं म्हणत सामनाने पुन्हा एकदा ममतांच्या दौऱ्यांचं समर्थन केलं.
www.konkantoday.com