देवरूख-रत्नागिरी एसटी सेवा बंद, असंख्य कामगारांसमोरील रोजीरोटीचा प्रश्न
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी महिनाभर कर्मचारी संपात सहभागी झाले असून त्यांचे कामबंद आंदोलन अद्यापही सुरूच आहे. महिला, मुली यांच्यासह असंख्य कामगारांसमोर रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
देवरूख-रत्नागिरी मार्गावरील दिवसरात्र सुरू असणार्या सर्वच फेर्या कामबंद आंदोलनामुळे बंद आहेत. या मार्गावरून असंख्य कामगार रोजीरोटीसाठी विविध भागात जातात. महिनाभर एसटी बंद असल्याने प्रवासाचा गंभीर प्रश्न कामगारांवर आला आहे. अनेक महिला, मुलींवर असलेली नोकरी सोडण्याची वेळ आली आहे. शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचार्यांची देवरूख-रत्नागिरी मार्गावर खाजगी वाहनाने ये-जा सुरू आहे त्यांंच्याकडे स्वतःच्या वाहनांची सुविधा उपलब्ध नाही. अशांना नोकरी सोडण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. कुटुंबियाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा गंभीर प्रश्न कामगारांसमोर निर्माण झाला आहे. सर्वाधिक उत्पन्न देणारा देवरूख-रत्नागिरी मार्ग महिनाभर बंद आहे. www.konkantoday.com