
सह्याद्री पॉलिटेक्निकमध्ये आणखी तीन नवे अभ्यासक्रम
सावर्डे : येथील सह्याद्री पॉलिटेक्निक येथे आगामी शैक्षणिक वर्षासाठी तीन नव्या अभ्यासक्रमांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता स्थानिक विद्यार्थ्यांना नवे पर्याय खुले होणार आहेत. या वर्षापासूनच हे विद्यार्थी या अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. डिप्लोमा इन इंटेरियर डिझायनिंग अॅण्ड डेकोरेशन हा अभ्यासक्रम दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच अॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर सेफ्टी इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम डिप्लोमा किंवा डिग्री पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर अॅडव्हान्स डिप्लोमा इन ट्रॅव्हल अॅण्ड टूरिझम हा अभ्यासक्रम एक वर्षासाठी असून कोणताही पदवीधर विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतो. या अभ्यासक्रमांसाठी अलिकडेच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळणार आहे. अधिक माहितीसाठी श्री. यशवंतराव, श्री. देवरूखकर, प्राचार्य मंगेश भोसले यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com