रत्नागिरी विभागातील एसटीच्या ६०६ गाडयाचा,देखभाल -दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च अधिकारी, पर्यवेक्षकांच्या तत्परतेमुळे टळला
सध्या एसटीचे कर्मचारी संपावर आहेत . गेले तीन आठवडे चालक, वाहक, कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत. जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विभागीय कार्यशाळेच्या अधिकारी, पर्यवेक्षकांनी याबाबत दक्षता घेतली. दररोज एसटी काही मिनिटे सुरू करणे, कार्यशाळेत एक फेरी मारणे या प्रकारामुळे विभागातील सर्व गाड्या सुस्थितीत असल्याने लाखोंचा खर्च टळला आहे.
जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होणे, बॅटरी उतरणे, एअरकंडीशन गाड्यांच्या एसी नादुरुस्त होणे याशिवाय गाडी सहज सुरू न होता धक्का मारून सुरू करण्याची समस्या उद्भवली असती. रत्नागिरी विभागात ६०६ गाड्या असून, देखभाल-दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला असता. मात्र हा खर्च अधिकारी, पर्यवेक्षकांच्या तत्परतेमुळे टळला आहे.
www.konkantoday.com