महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.मुख्य परीक्षा दिनांक ७ ते ९ मे २०२२ रोजी होईल. परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या अंदाजित स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल, अशी माहिती एमपीएससी (MPSC) प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शनिवारी एमपीएससी प्रशासनाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com