
ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका ४० वर्षे व त्यावरील वयोगटाच्या लोकांना असल्याने त्यांना बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता!
४० वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा विचार होण्याची शक्यताआहे, अशी माहिती देशभरातील प्रयोगशाळांच्या इन्साकॉग नेटवर्कच्या साप्ताहिक वार्तापत्रात देण्यात आलीआहे. अशा बूस्टर डोससंदर्भातील शिफारस इन्साकॉगने केंद्र सरकारला केली आहे.
ज्यांनी आजवर लस घेतलेली नाही, त्यांना ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका आहे याची जाणीवही इन्साकॉगने करून दिली आहे. या संस्थेने म्हटले आहे की, सध्याच्या लसींमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज या नव्या
विषाणूला निष्प्रभ करण्यासाठी पुरेशा ठरणार नाहीत अशी शक्यता आहे. मात्र नव्या विषाणूमुळे होणाऱ्या
संसर्गाची तीव्रता मात्र पूर्वीच्या विषाणूंच्या तुलनेत कमी असू शकेल.
ओमायक्रॉनमुळे सर्वाधिक धोका ४० वर्षे व त्यावरील वयोगटाच्या लोकांना असल्याने त्यांना बूस्टर डोस देण्यात यावेत, असे इन्साकॉगचे मत आहे. या नव्या विषाणूचे अस्तित्व लवकर शोधून काढण्यासाठी जिनोमिक सिक्वेंसिंग अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे शक्य होईल.
www.konkantoday.com