स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने खेड रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून दुचाकी चोरणार्या टोळीला ताब्यात घेतले
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी खेड रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून दुचाकी चोरणार्या दोघांना ताब्यात घेतले.त्यानंतर त्यांच्या अन्य साथिदारांनाही दुचाकि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दुचाकि चोरीचे, घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.तसेच या पथकाने लोटे येथील गोडावूनमध्ये चोरी करणार्या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.रोहिदास बाळू पवार (25,रा.पिंपळू खुर्द,चिपळूण),अजय चौधरी(25),दिपक लिव्हारे (22),सागर कातुर्ड (28,सर्व रा.खेर्डी,चिपळूण) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकिस चोरीतील संशयित आरोपींची नावे आहेत.या संशयितांवर चिपळूण,खेड,देवरुख,पालघर,नवी मुंबई येथील तळोजा पोलिस ठाण्यांमध्ये दुचाकि चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून ७दुचाकि जप्त करण्यात आल्या असून पुढील कारवाईसाठी चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
www.konkantoday.com