
सागरी सुरक्षा कवच अभियान जिल्ह्यातील विविध समुद्राच्या ठिकाणी राबवण्यात आले
कोकणाला समुद्रकिनारा हा विस्तृत लाभलेला आहे. यामुळे समुद्रामार्गे कोणी दहशतवादी येऊन जिल्ह्यात घुसखोरी करून हल्ला करू शकतो, या शक्यतेमुळे सागरी किनारा किती सुरक्षित आहे, हे पडताळून पाहण्यासाठी सागरी सुरक्षा कवच हे अभियान जिल्ह्यातील विविध समुद्राच्या ठिकाणी राबवण्यात आले
. या अभियानाचा मुख्य उद्देश किनाऱ्यावरील सुरक्षा हा आहे. कोकणात अनोळखी व्यक्ती बोट घेऊन समुद्रामार्गे दाखल झाल्या तर सर्व यंत्रणा किती सतर्क आहेत, हे या मोहिमेत तपासण्यात आले. जिल्ह्यातील सर्व जेटींवरील पोलीस चौक्या तसेच विविध ठिकाणांचे तपासणी नाके किती सतर्क आहेत, हे या अभियानात तपासण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या अभियानात काही ठिकाणी भेटी देऊन पोलीस अधिकारी व अंमलदार या अभियानाच्या वेळी सतर्क आहेत का, याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. समुद्रकिनारी किंवा आसपास संशयित काही दिसले तर लगेचच स्थानिक व जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. गर्ग यांनी नागरिकांना केले आहे.
www.konkantoday.com