
साखरपा जाधववाडी येथील ६० वर्षीय वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील ६० वर्षीय वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची माहिती गुरुवार दिनांक २ डिसेंबर रोजी देवरूख पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे.देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अनंत विष्णू जाधव असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत अमित जाधव यांनी फिर्याद दिली आहे. अनंत जाधव यांच्या पायाला ३० नोव्हेंबर रोजी सर्पदंश झाला होता. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे.
www.konkantoday.com