संप तात्काळ मागे न घेतल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करावी लागेल -परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ देण्यात आली असून विलीनीकरणाच्या प्रश्नासाठी समिती नेमण्यात आली आहे. अशा वेळी लाखो प्रवाशांना वेठीस धरून काही एसटी कामगारांनी आपला संप सुरूच ठेवला आहे.या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून हा संप तात्काळ मागे न घेतल्यास मेस्मा (अत्यावश्यक सेवा कायदा) अंतर्गत कारवाई करावी लागेल, असा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला. तसेच या संपात ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेले महिनाभर एसटी कामगारांचा संप सुरूअसून महागाई भत्त्यापासून मूळ वेतनातील वाढीसह एसटी कामगारांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. एसटीच्या इतिहासात मिळाली नसेल एवढी ४१ टक्के वाढ कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार विलीनीकरणाच्या प्रश्नावर समिती स्थापन करण्यात आली असून १२ आठवडय़ांत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल सरकारवर बंधनकारक असल्याचे परब यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button