विरोधकांकडे दुसरे कोणतेच काम नसल्यामुळे फक्त आणि फक्त टीका करण्याचे काम विरोधक करत आहेत -बिपीन बंदरकर, शिवसेना शहर प्रमुख

गेली दोन वर्ष रत्नागिरी नगरपालीकेमधील शिवसेनेच्या सत्तास्थानावर सातत्याने टीका केली जात आहे.सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ, लेख शिवसेनेच्या विरोधात लिहून पाठवले जात आहेत .
रत्नागिरी नगरपालिका हद्दीतील रस्ते खराब आहेत त्याचा दोष शिवसेनेचे नगर सेवक व नगराध्यक्ष यांच्यावर लावला जातोय. जेणेकरून एक वेगळी यंत्रणाच विरोधी पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका करण्यासाठी उभी केलेली दिसतेय जी कधी गॅस,पेट्रोल,डिझेल वाढीवर ,महागाईवर बोलताना दिसत नाही.कारण त्यांच्या म्हणण्यानुसार रत्नागिरीकरांना रस्त्याचा त्रास जास्त होतोय कोणत्याही दरवाढीचा नाही.
पण एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की गेली दोन वर्ष रत्नागिरी नगरपालिकेच्या माध्यमातून नळपाणी योजनेचे काम सुरू आहे, सीएनजी गॅस पाईप काम सुरू आहे, महावितरण ची लाईन टाकण्याचे काम सुरू आहे तसेच जिओ ऑप्टिकल फायबर चे काम हे देखील सुरू आहे. हे सर्व काम सुरू असताना संपूर्ण शहरातील रस्त्यांची खोदाई झालेली आहे त्यात पावसाळा सुरू झाल्यावर रस्त्यामधील खड्ड्यांचा लोकांना खूप त्रास सहन करावा लागला आहे.
मुळातच नळपाणीयोजनेचे काम सुरू झालं आणि *विरोधकांनी नळ पाणी योजनेच्या कामाला हरकत घेतली व त्यावर मा जिल्हाधिकारी यांचे दालनात स्थगिती घेतली स्थगिती घेतल्यानंतर स्थगिती बरोबर एक वर्षांनी उठली हि स्थागिती उठवण्यासाठी माननीय आमदार उदय सामंत व खासदार विनायकजी राऊत साहेब यांनी अथक प्रयत्न केले आणि विरोधकांनी स्थगिती घेतल्यामुळे नळपाणी योजनेच्या कामाला एक वर्ष उशीर झाला. एक वर्ष उशीर झाल्यामुळे एक वर्षांमध्ये नळपाणी योजनेमधील पाईप च्या किमती अंदाजे 30 टक्क्यांनी वाढली होती,त्यामुळे ती योजना सुरू करण्यासाठी अजून दोन महिने वाढले. तरी सर्व रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या हेतूने रस्त्यांच्या सर्व कामाची वर्कऑर्डर पंधरा मे च्या आधी दिली गेली ,15 मे 25 मे पर्यंत रस्ते पूर्ण करण्याची तयारी शिवसेनेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केली होती.पण 15 मे रोजी तोक्ते वादळ आलं आणि रत्नागिरी शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली ते आत्ता 26 नोव्हेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडत होता.आजही हे सांगत असताना डिसेंबर महिन्यात पाऊस पडत आहे आणि हा पाऊस सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाना अढथळा आणत आहे,नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला, त्यांना त्रास होतोय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण कोणताही विकास काम करताना त्याचा थोडा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो, आणि तो रत्नागिरीच्या नागरिकांना देखील करावा लागला ,पुढे याच गोष्टीचा फायदा घेऊन विरोधकांनी शिवसेनेच्या सत्तेवर कडाडून टीका करण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू ठेवले जेणेकरून हे सर्व शिवसेनेने मुद्दामून केले आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला ,मुळातच ज्या ठिकाणी नळपाणी योजनेचे काम चालू आहे, त्याठिकाणी नळपाणी योजनेचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत डांबरीकरण करू नये,असा आदेश त्यावेळेचे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सरकारने काढला होता..रस्त्याचे काम सुरू करताना देखील प्रचंड टिकेचा भडिमार सहन करावा लागला,आज रोजी रत्नागिरी शहरातील रस्त्याची काम सुरू होताना दिसत आहेत.जी यापूर्वी 2014 साली म्हणजेच 7 वर्षांपूर्वी करण्यात आली होती.एकदा रस्ते पूर्ण झाले की शिवसेनेवर बोलण्याची संधी मिळणार नाही आणि जनमत शिवसेनेच्या बाजूने अधिक जास्त प्रमाणात राहील म्हणून विरोधकांचा हा बदनामी करण्याचा शेवटचा प्रयत्न चालला आहे.
*मागील दोन वर्ष कोरोना सारख्या महामारी मध्ये संपूर्ण जग लढत आहे त्याचा फटका रत्नागिरी शहराला देखील बसला आहे.
*मागील दोन वर्षे लोकांनी घरात बसून दिवस काढले आहेत. प्रत्येकाच्या कामाला जशी खीळ बसली तशी विकासकामे देखील खोळंबली आहेत. शेवटी माणसांशिवाय काम होत नाहीत हे सत्य आहे.*या संकटात प्रथम प्राधान्य देताना विकास कामाचा निधी देखील कोविडसाठी वळवण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोविंडमुळे प्रचंड घबराट पसरली होती. सर्वसामान्य नागरिकाना कोविडची लागण होऊ नये म्हणून,खबरदारी म्हणून शासनाने जे नियम लावले होते त्या नियमांचे पालन करताना घरामध्ये बसून होते.

*अशा परिस्थितीमध्ये देखील शिवसेनेचा सामान्य शिवसैनिक देखील रत्नागिरीतील नागरिकांसाठी हॉस्पिटल मध्ये जाऊन स्वतः मदत करत होते .लोकप्रतिनिधी देखील मदत करत होते .कोविड पेशंट ना ॲडमिट करणे त्यांना सुविधा, ऑक्सिजन पुरवणे इत्यादी सारखे कामें करणे त्याचबरोबर गरजू धान्यपुरवणे,जीवनावश्यक वस्तू पुरवणे ही सर्व कामं शिवसैनिक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या कोरोनाच्या काळामध्ये करत होते.अनेक जण यावेळी बाधित देखील झाले.लसीकरण मोहीम सुरू झाली तेव्हा आपल्या नागरिकाचं लसीकरण झाला आहे की नाही हे बघून नागरिकांना लस उपलब्ध करून देत होते प्रत्येकाला लस उपलब्ध करून देण्याचं काम शिवसेनेचे नगराध्यक्ष नगरसेवक व सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी मिळून करत होते, या वेळी देखील टीका करणाऱ्यांनी टीका करणे सोडले नव्हते, अशा परिस्थितीत देखील विरोधक फक्त आणि फक्त टीकाच करत होते.
*रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत साहेब व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री रत्नागिरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार ना.उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे नगराध्यक्ष नगरसेवक शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक कोरोनाच्या काळामध्ये अहोरात्र मदत करत होते .या काळामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना उदयजी सामंत साहेब यांच्या सहकार्याने,शिवसेना पक्षाच्या माध्यमातून रत्नागिरीतील शहर आणि ग्रामीण भागातील 20000 तरुणांचे लसीकरण करण्यात आले.
*शिवसेनेची सत्ता नगरपालिकेत आल्यानंतर संपूर्ण शहरांमध्ये रस्ते ,गटार,स्ट्रीट लाईट,स्वच्छता अभियानाची कामे मार्गी लागली. पर्यायाने रत्नागिरी नगरपरिषदला दोन वर्ष संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार मिळाला व स्वच्छतेचे पारितोषिक देखील मिळाले.
वंदनिय बाळासाहेब ठाकरे तारांगण चे काम पूर्णत्वास आले आहे,शहरातील आवश्यक ठिकाणी गार्डन्स तयार करण्यात आली आहेत . रत्नागिरी शहराला ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो तो फिल्टरेशन प्लांट अद्यावयात करण्यात आला आहे .
*माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून इंजिनिअरिंगचे डिग्री कॉलेज सुरू होतं आहे,कवी कालिदास संस्कृत महाविद्यालय हे सुरू झालं, फार्मसी चे कॉलेज सुरू झालं आणि नुसते रस्ते गटार पाणी यावर भर न देता सर्वांगीण विकासावर भर देत रत्नागिरीचा विद्यार्थी शैक्षणिक सुदृढ व्हायला पाहिजे या दृष्टीने रत्नागिरी शैक्षणिक हब होण्यासाठी मा.उदयजी सामंत हे प्रयत्नशील आहेत.,मेडिकल कॉलेज प्रस्ताव देखील शासन स्तरावर असून तो मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे.
अनेक प्रकारची विकास कामे रत्नागिरी नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत तरी देखील या महामारीच्या काळामध्ये सर्व अडचणींवर मात करून रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष सर्व सभापती सर्व नगरसेवक व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिक नागरिकांच्या मदतीला धावून येत आहेत.
*विरोधकांकडे दुसरे कोणतेच काम नसल्यामुळे फक्त आणि फक्त टीका करण्याचे काम विरोधक करत आहेत सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या पोस्ट टाकणे, वेगवेगळे व्हिडिओ टाकणे या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम त्यांच्याकडे नाही.
*मला एकच सांगावसं वाटतंय रत्नागिरीतील या जनतेने शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं आहे आणि शिवसेनाही त्यांच्या प्रेमाला पात्र ठरण्यासाठी *प्रामाणिक प्रयत्न करत आहे. मला खात्री आहे विरोधकांन मार्फत सोशल मीडियावर येणारे खोटे लेख, बदनामी करणाऱ्या *बातम्या,बदनामी करणारे व्हिडिओ, खोटे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावर रत्नागिरीकर कधीच *विश्वास ठेवणार नाहीत,त्यांचा शिवसेनेवर पूर्ण विश्वास आहे. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेवरील विश्वास नागरिकांच्या मनामध्ये ठाम राहील आणि नागरिक देखील शिवसेनेवर भरभरून प्रेम करतील असेही बंदरकर यांनी म्हटलं आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button