महाराष्ट्राला एकूण पुरविण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी ६०टक्के व्हेंटिलेटर हे खराब -खासदार विनायक राऊत यांचा केंद्र सरकारवर आरोप

कोविड महामारी सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदाच कोविड परिस्थितीवर लोकसभेत चर्चा होत आहे. विषयाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आणि आरोप केला केला की महाराष्ट्राला एकूण पुरविण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी ६०टक्के व्हेंटिलेटर हे खराब होते.
महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात कोविडची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना पीएम केअर अंतर्गत राज्यांना व्हेंटिलेटरचे वाटप करण्यात आले होते. पण महाराष्ट्रात जे हजारो व्हेंटिलेटर पुरवण्यात आले होतेस त्यापैकी ६०टक्के व्हेंटिलेटर कामच करत नव्हते, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. याबाबत चौकशी करण्याची मागणीही राऊत यांनी संसदेत केली आहे.
भारतातील प्राणघातक दुसऱ्या कोविड लाटेत, भारतातील अनेक लोकांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर बेडची अनुपलब्धता यामुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र, केंद्र सरकारने दुसऱ्या लाटेत भारतात ऑक्सिजनची कमतरता असल्याचे कधीही मान्य केलेले नाही.विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात म्हणाले की मुंबई आणि महाराष्ट्राने ज्या प्रकारे कोविड परिस्थितीवर नियंत्रण आणले, त्याचे जगाने कौतुक केले आहे. धारावी पॅटर्नची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली, आणि आता मुंबईतील कोविडची परिस्थिती नियंत्रणात आहे, असे ते म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button