कोयना प्रकल्पाच्या दोन टप्प्यांचे खाजगीकरण झाल्यास महानिर्मिती कंपनीत काम करणार्या अडीचशेहून अधिक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न
कोयना प्रकल्पाच्या दोन टप्प्यांचे खाजगीकरण झाल्यास महानिर्मिती कंपनीत काम करणार्या अडीचशेहून अधिक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. महानिर्मिती कंपनीच्या इतर प्रकल्पांत हजर होणे किंवा स्वेच्छानिवृत्ती असे दोन पर्याय कर्मचार्यांसमोर असतील.
जलसंपदाने महानिर्मिती कंपनीला चालवण्यासाठी दिलेल्या २७ पैकी सहा प्रकल्प पुन्हा जलसंपदा विभागाकडे देखभाल दुरूस्तीसाठी हस्तांतरित केले जाणार. प्रत्यक्षात त्यांचे उर्जा निर्मितीच्या योजना आखणे, त्यांचे अन्वेषण करणे, संकल्पचित्र, बांधकाम करणे आणि व्यवस्था पाहणे आदी कारणांसाठी खाजगी कंपनीला निविदा प्रक्रियेद्वारे हस्तांतरण करणार आहे.
www.konkantoday.com