
रत्नागिरी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा डॉ. तानाजीराव चोरगे व उपाध्यक्ष पदी बाबाजी जाधव यांची निवड
रनागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदी पुन्हा एकदा डॉ. तानाजीराव चोरगे यांची तर उपाध्यक्ष पदी बाबाजी जाधव यांची एकमताने निवड झाली आजजिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. तत्पूर्वी जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक झाली या बैठकीत अध्यक्ष पदासाठी डॉ. तानाजीराव चोरगे तर उपाध्यक्ष पदासाठी बाबाजी जाधव यांची नावे निश्चित करण्यात आली. दोघांच्याही नावावर सर्व संचालकांचे एकमत झाले.
त्यानंतर जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्ष पदी डॉ. चोरगे तर उपाध्यक्ष पदी श्री. जाधव यांची निवड झाल्यानंतर सर्व संचालकांनी , बँकेच्या कर्मचार्यानी तसेच को-ऑप बॅंक्स एम्प्लॉयईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी आदींनी अभिनंदन केले आहे
www.konkantoday.com