गुहागरात पर्यटन वाढीसाठी कोकण हेरिटेज राईड
गुहागरातील शांताई रिसॉर्टचे संचालक सिद्धेश खानविलकर यांनी नुकतेच कोकण हेरिटेज राईटचे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत विविध राज्यातील ६० विंटेज दुचाकीस्वार दोन दिवस गुहागरात पर्यटनासाठी आले होते. या निमित्ताने गुहागरकरांना जावा, एजडीई, जुन्या बुलेट या विंटेज बाईक पाहता आल्या.
कोकणातील निसर्गसौंदर्य, येथील जनजीवन, वास्तू कला, परंपरा विविध राज्यात पोचावी म्हणून कोकण हेरिटेज राईड हा उपक्रम सिद्धेश खानविलकर आणि प्रविण रणपीसे यांनी आयोजित केला होता. यामध्ये सहभागी झालेल्या पर्यटकांना अडूर बुधल गावातील डोंगरावर असलेले दुर्गादेवी मंदिर, गुहागर मधील १०६ वर्ष जुने कोकणातील घर, समुद्र किनारा, व्याडेश्वर मंदिर आदी स्थळे दाखविण्यात आली. या राईडचे वैशिष्ट्य म्हणजे रॅलीत ५० वर्षापूर्वी लोकप्रिय असलेल्या जावा एसडी, बुलेट यांचा समावेश होता. सर्वात जुनी गाडी १९६२ मधील होती. एक गाडी १९७० मध्ये वाहनप्रेमींना जुन्या गाड्या पहाण्याची संधी मिळाली. या उपक्रमात पुणे आणि मुंबईतील ७ महिला दुचाकीस्वार सहभागी झाल्या होत्या.
www.konkantoday.com