सातबारा संगणकीकरणामुळे शेतकरी कुळांची नोंद गायब
चिपळूण तालुक्यातील पेढे येथील शेतकरी वर्षानुवर्षे त्यांची जमीन कसत आहेत. शेतीवरच अनेक शेतकर्यांची गुजराण चालू आहे. तरीही तेथील शेतकर्यांना (कुळांना) शेतकरी दाखला मिळत नाही. शासनाच्या पीक पाहणी ऍपवर कुळांची नावे नाहीत. ऑनलाईन काढलेल्या सातबारा उतार्यावर व ८ अ उतार्यावर कुळांची नोंद असायची. मात्र सातबार्याचे संगणकीकरण झाल्यापासून ही व्यवस्था बंद झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांवर अन्याय होत असून पेढे गावातील शेतकरी कुळांना न्याय द्यावा, अशी मागणी पेढे गावचे सरपंच प्रविण पाकळे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत केली आहे.
www.konkantoday.com