रत्नागिरीतील एसटी कर्मचारी संपावर अजूनही ठाम, विलनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार
काल शासनाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी अंतिरम वेतनवाढ जाहीर केले त्यानंतर आज नाट्यपूर्ण घडामोडी होऊन या आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते त्यामुळे हा संप मिटेल असे वाटले होते मात्र सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अजुनही एस टी कर्मचारी ठाम आहेत त्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे रत्नागिरीतही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन सुरू आहे या कर्मचार्यांनी संप पुढे चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे वेतनवाढीबाबत बाेलताना हे कर्मचारी म्हणतात की आम्ही मागतो एक आणि शासन देते एक आमची महत्त्वाची मागणी विलीनीकरणाची आहे त्यावर आम्ही ठाम आहोत त्यामुळे आम्ही आमचे काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे या आंदोलनात सहभागी झालेल्या मृण्मयी मोरे यांनी सांगितले राज्यातही अनेक भागात असे चित्र आहे त्यामुळे एसटी कर्मचारी संप मागे घेण्याच्या मन स्थितीत नसल्याचे दिसत आहे
www.konkantoday.com