एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते विलिनीकरणावर ठाम
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. मात्र, आझाद मैदानावर मागील १५दिवसांपासून ठाण मांडून बसलेले एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे.कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करु असं सांगितलं आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते विलिनीकरणावर ठाम आहेत. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याशी चर्चा करुन आंदोलनाची पुढील दिशा सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर करु, असं पडळकर आणि खोत यांनी सांगितलं.
त्यानंतर काही वेळानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते आझाद मैदानावर दाखल झाले. सदावर्ते यांचं आगमन होताच आझाद मैदानात जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व आता पडळकर आणि खोत यांच्याकडून सदावर्तेंकडे आलं का? असं चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी विलिनीकरणाशिवाय माघार नाही, अशी घोषणाच सदावर्ते यांनी केली यावेळी सदावर्ते यांनी महाआघाडी सरकारवर विशेषतः शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली या पार्श्वभूमीवर आता आझाद मैदानात दोन वेगळे गट तयार होताना दिसून येत आहेत. त्यामुळे एसटीच्या संपाचे भवितव्य काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे
www.konkaboday.com