अजूनही कर्मचाऱी त्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून राज्यभरात संप सुरु ,११ वाजता भूमिका जाहीर करणार
कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन सरकारने केलं होतं. मात्र अजूनही कर्मचाऱी त्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून राज्यभरात संप सुरु आहे.
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनात पगारवाढ देण्याची घोषणा केली. तसंच ही पगारवाढ नोव्हेंबरपासून देऊ असंही सरकारने म्हटलं.मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी अंतरिम पगारवाढ मान्य नाही आम्हाला विलिनीकरणच हवं आहे या मागणीवर कर्मचाऱी ठाम आहेत. आम्हाला सरकारने पगारवाढीचे गाजर दाखवू नये अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आता यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर हे सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन कर्मचाऱ्यांची भूमिका आणि पुढच्या वाटचालीबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. आज सकाळी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन सरकारने केलं होतं. मात्र अजूनही कर्मचाऱी त्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून राज्यभरात संप सुरु आहे.
www.konkantoday.com