
जनतेला नको असेल तर रायगडमध्येही रिफायनरीला शिवसेना विरोध करणार ः अनंत गीते
रत्नागिरी ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्प रायगड येथे नेणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता या ठिकाणी देखील या प्रकल्पाच्या विरोधात वातावरण होवू लागले आहे. शेतकरी कामगार पक्षाने या प्रकल्पाला विरोध दाखविला असून त्या पाठोपाठ शिवसेना देखील या प्रकल्पाला विरोध करण्याच्या भूमिकेत आहे.
नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प केवळ शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द झाला आहे. जर रायगडमधील जनतेलाही हा प्रकल्प नको असेल तर शिवसेना तिथल्या जनतेसोबत राहिल, असा इशारा शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनंत गीते यांनी दिला आहे. रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्प हा शिवसेनेच्या विरोधामुळेच रद्द झाला आहे, असा पुनरूच्चार गीते यांनी यावेळी केला. राजापूर येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार होता.