लाखो एस टी कामगार रस्त्यावर, त्यांच्याशी बोलणी करा व त्यांच्यावरील अन्याय दूर करा- माजी खासदार किरीट सोमय्यां यांची रत्नागिरीत मागणी
गेले सोळा दिवस एसटीचे कर्मचारी अभूतपूर्व शांततेने आंदोलन करीत आहेत लाखो लोक रस्त्यावर आहेत
शासनाने त्यांच्याशी बोलणी करून त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीत केली किरीट सोमय्या रत्नागिरीच्या दौर्यावर असता उपोषणासाठी बसलेल्या एसटी कामगारांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला
परिवहनमंत्री अनिल परब व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी चार तास बोलणी केली मग हे करतायत काय ,ही नाटकं बंद करा आणि या कामगारांना न्याय द्या असे म्हणत सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली हे सरकार म्हणजे घोटाळेबाज माफिया सरकार आहे चाळीस लोकांचा मृत्यू झाला मग अनिल परब करतात काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा असे सोमय्या यांनी म्हटले आहे
www .konkantoday.com