
बोगस डॉक्टर शोधून काढण्यासाठी येत्या काळात दरमहा तालुकानिहाय ५डॉक्टरांच्या कागदपत्रांची तपासणी होणार
बोगस डॉक्टर शोधून काढण्यासाठी येत्या काळात दरमहा तालुकानिहाय ५डॉक्टरांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. याबाबत झालेल्या एका बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी संबधित समितीला निर्देश दिले.
या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. आतापर्यंत जिल्हयात बोगस डॉक्टरची १३ प्रकरणे नोंदली आहेत. यात वेगाने कामकाज करुन ती अंतिम करावीत तसेच इतर बाबतीत आगामी काळात अधिक सतर्कता बाळगून कारवाईची कामगिरी करा असे ते म्हणाले.
www.konkantoday.com