
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ २०२४ साली खुले होणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची गेल्या अनेक वर्षापासून डेडलाईनवर डेडलाईन देणारी सिडको आता अंतिम टप्यात आली आहे. सिडकोने अखेर विमानतळाची अंतीम तारीख ठरवली असून तीन वर्षानंतर नवी मुंबईकरांना विमान हवेत झेपावताना पहायला मिळणार आहे.डिसेंबर २०२४ मध्ये पहिले विमान उडणार आहे.
विमानतळासंबंधी सिडकोचे एम.डी. संजय मुखर्जी यांनी विमानतळाचे डिझाईन असलेले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी२०२४ साली पहिले विमान उडण्याचे जाहीर केले आहे. नवी मुंबई आणि पनवेल च्या मध्यभागी जवळपास २४ हजार कोटी खर्च करत हे विमानतळ उभे राहत आहे. वर्षांला ६०लाख प्रवाशी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर करणार आहेत.
www.konkantoday.com