आ. योगेश कदम यांच्या प्रयत्नाने १४ वर्षानंतर दापोलीतील एका कुटुंबाला वीज मिळाली
दापोलीचे आ. योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नाने कोकंबा आळीतील एका कुटुंबाचा वीजपुरवठा तब्बल १४ वर्षानंतर सुरू झाला आहे.
दापोली शहरातील कोकंबा आळीमधील विनीता खळे या कुटुंबासह गेली १४ वर्षे वीज नसल्याने अंधारात होत्या. सदर बाब स्थानिक नगरसेवक केदार परांजपे, शाखाप्रमुख सुयोग घाग, निलेश राऊत व पदाधिकारी यांनी आमदार योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी त्वरित विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे संपर्क साधून खळे कुटुंबियांस नव्याने विद्युत पुरवठा जोडून देण्यास सांगितले. आ. कदम यांच्यामुळे त्या कुटुंबाचा वीज पुरवठा सुरू झाला. खळे कुटुंबियांनी आ. कदम, नगरसेवक व पदाधिकार्यांचे आभार मानले. www.konkantoday.com