स्कायवॉकचा अवैध कामांसाठी वापर,निषेध व्यक्त करण्यासाठी शहर मनसेच्या वतीने मेणबत्त्या लावून केले गांधीगिरी आंदोलन

रत्नागिरी शहरात माळनाका येथे उभारण्यात आलेल्या स्कायवॉकची गैरवापर होत असल्याचे मनसेच्या वतीने निदर्शनास आणण्यात आले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर कार्यकारिणीतर्फे माळनाका येथील स्कायवॉकचा अवैध कामांसाठी होत असलेला वापर जनतेपुढे आणला आहे. यावर अंकुश लावण्यासाठी स्कायवॉकवर लवकरात लवकर विजेचे दिवे बसवून येथील साफसफाई करण्याची मागणी मनसेतर्फे केली आहे.
रत्नागिरी शहरातील माळनाका येथे भलामोठा स्कायवॉक बांधला आहे. अवाढव्य स्कायवॉकचा वापर नागरिकांकडून होत नाही. या परिसरात शाळा, महाविद्याय असल्यामुळे अपघात टाळण्यासाठी मुलांसाठी स्कायवॉक बांधला आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्ची केला आहे. पण त्याचा गैरवापर केला जात आहे. बर्‍याच दिवसांपासून पुलावर दारूच्या बाटल्या पहावयास मिळत आहेत. पालिकेकडून स्वच्छताही केेलेली नाही. ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मनसेने गांधीगिरी केली. पुलावरील घाण बाजूला करून तेथे स्वच्छता करण्यात आली. तसेच पुलावर मेणबत्त्या लावल्या आणि निषेध व्यक्त करण्यात आला.
सामान्य जनतेच्या उपयोगी हा स्कायवॉक येत नाही. वीज नसल्यामुळे रात्रीच्यावेळी येथून कोणी जात नाही. विजेचे दिवे लावून आणि साफसफाई करून हा स्कायवॉक लोकांसाठी खुला करावा अशी मनसेने मागणी केली. या वेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत, उपशहराध्यक्ष अमोल श्रीनाथ, गौरव चव्हाण, मयुरेश मडके आदी उपस्थित होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button