बेपत्ता खलाशांच्या कुटुंबाला शासनस्तरावर मदत करणार -आ. भास्कर जाधव
जयगड येथून बेपत्ता झालेल्या मच्छिमार बोटीला बरेच दिवस उलटून गेले असून यातील खलाशी आता जीवंत सापडण्याची आशा धुसर झाली आहे. हे सर्व खलाशी गुहागर तालुक्यातील गरीब कुटुंबातील असून त्यांच्या निराधार कुटुंबाला मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. दुर्दैवाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा याबाबतचा कायदा मात्र वेगळा आहे. तरीही मी या बाबत सातत्याने शासनाच्या संपर्कात असून शासनाकडून व खाजगी व्यावसायिकांकडून या कुटुंबांना मदत मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
www.konkantoday.com