
जलस्त्रोतांची तपासणी करणार्या प्रयोगशाळा बंद,राज्यातील ५१४ कंत्राटी कर्मचार्यांनी आपल्या उपजिविका वाचविण्यासाठी उच्च न्यायालयात
पाणी म्हणजे जीवन व जीवन म्हणजे पाणी. अशा जीवनावश्ययक पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणार्या पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोग शाळेतील कंत्राटी कर्मचार्यांवर शासनाने खाजगीकरणाची कुर्हाड चालविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या विरोधात राज्यातील ५१४ कंत्राटी कर्मचार्यांनी आपल्या उपजिविका वाचविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
याबाबत न्यायालयाने प्रथम सुनावणीत स्पष्ट आदेश दिले असताना देखील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या कंत्राटी कर्मचार्यांचे अकरा महिन्यांचे नियुक्ती आदेश संपुष्टात आल्यानंतर पुनर्नियुक्ती आदेश न देता कालावधी संपलेल्या कर्मचार्यांना काम करण्यास मज्जाव करीत आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचार्यांचा देखील समावेश आहे. कर्मचार्यांअभावी पाणी नुमना तपासणी होत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात येणार आहे.
www.konkantoday.com