सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोचेमाड समुद्रात पारंपारिक मासेमारी पद्धतीने मासेमारी करताना तीन डॉल्फिन सापडले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोचेमाड समुद्रात पारंपारिक मासेमारी पद्धतीने करण्यात येत असलेल्या रापण या मासेमारी प्रकारातील जाळ्यात तीन मोठे डॉल्फिन मासे सापडून आले. रापण संघाच्या सदस्यांनी या डॉल्फिन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढून पुन्हा समुद्रात सोडत जीवदान दिले.रापणीच्या जाळ्यात सापडलेल्या या डॉल्फिन माश्यांना पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यावर एकच गर्दी केली होती.
मालवणच्या चिवला बीचवर गेल्याच आठवड्यात असाच प्रकार घडला होता. तेथील न्यू रापण संघ रेवतळे यांनी लावलेल्या रापणीत चक्क ८ ते १० छोटे, मोठे डॉल्फीन सापडून आले. रापण संघाच्या सदस्यांनी या डॉल्फीन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढत पुन्हा समुद्रात सोडत जीवदान दिले होते. त्या पाठोपाठ आता मोचेमाडमध्येही असाच प्रकार घडला.
www.konkantoday.com