सांस्कृतिक केंद्राचा सदोष अहवाल सभागृहाने फेटाळला
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केेंद्राच्या कामाबाबत कोल्हापूर येथील नागेश देशपांडे यांच्या एन्गार्ज आर्किटेक्ट फर्मने सादर केलेला अहवाल सदोष असून त्यामध्ये त्रूटी आहेत. या त्रूटी दूर करून पूरपरिस्थितीनंतरची वस्तुस्थिती पाहून वस्तूनिष्ठ अहवाल सादर करावा असा ठराव आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी मांडला. त्याला नगरसेवक अविनाश केळस्कर यांनी अनुमोदन दिले व बहुमताने हा ठराव मंजूर झाला. या ठरावाविरोधात नगरसेवक निशिकांत भोजने यांनी उपसूचना मांडली परंतु उपसूचनेच्या बाजूने केवळ भाजपाची ५ मते पडल्याने ती फेटाळण्यात आली. www.konkantoday.com