राजापूरात किसान क्रेडीट कार्डचे फार्म भरण्याच्या कार्यक्रमात नियोजन नाही ,बँकेचे व मत्स्य विभागाचे अधिकारीही फिरकले नाहीत
( छोट्या पेडणेकर ) कंत्राटी कामगार म्हणून मत्स्य विभागाने सागर मित्राना आपला सेवेत सामावून घेतले असताना ही मानधना साठी तातडीची बैठक बोलवून ही त्यावर तोडगा निघालेला नाही . सध्या मत्स्य विभागामार्फत किसान क्रेडीट कार्डचे फार्म भरण्याचा कार्यक्रम जोरदार सुरु करण्यात आला आहे . आणि हे काम सागरमित्रा वर सोपवण्यात आले आहे ज्या ठिकाणी हा कॅप काल लावण्यात आला होता त्या ठिकाणी बराच गोंधळ पाहिला मिळाला. असाच प्रकार राजापूर पंचायत समिती मध्ये फॉर्म भरण्यासाठी गेलेल्या सागर मित्राना आला . एसटीचा संप असल्याने मस्य विभागाने सागर मित्रांची जाण्याची व्यवस्था केली नाही स्वःखर्चाने कॅप ठीकाणी पोहचल्यावर ही सागर मिंत्राची परवड संपलेली नव्हती त्याठिकाणी कोणतीही केबिन अगर मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती . यांची ही अडचण तेथिल व्हेटनरी डॉक्टर च्या लक्षात आल्यानंतर त्यानी आपले केबिन सागरमित्रासाठी रीकामी करून दिली स्वःता मात्र दुसऱ्याच्या केबिनमधून आपले कामकाच चालवत होते याठिकाणी मत्स्य विभागाचा कोणताही अधिकारी नव्हता . तसंच सरकार शेतकऱ्याना, पशुपालन करण्याऱ्यांना, मत्स्य व्यावसायीकां साठी किसान क्रेडीट कार्डची योजना राबवत असताना बँका याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. काल दिवस भर बॅक अधिकाऱ्याला वारंवार फोन करूनही, त्याने दिवस भरात हजेरी लावली नाही . त्यामळे आलेल्या लाभार्थांनमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे मत्स्य विभायाचा कोणताही जबाबदार अधिकारी ही नव्हता त्यामुळे दर शुरुवारी लावण्यात येणारे कॅम्प सागर मित्राच्या जोरावर चालणण्यात येणार की गरजू ची ससेहोलपट करणार याचा खुलासा मा मत्सविभाग कार्यालय , तसेच संबंधित बॅकेने करणे गरजेचेआहे .याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा या योजना यशस्वी होणे कठीण आहे
www.konkantoday.com