कंगना राणावतने स्वातंत्र्य बद्दल केलेलं वादग्रस्त विधान मुळे रत्नागिरीत काँग्रेस महिला आघाडी झाली आक्रमक
रत्नागिरी –कंगना राणावतने स्वातंत्र्य बद्दल केलेलं वादग्रस्त विधान मुळे संपूर्ण देशामध्ये तीव्र विरोध होत असताना रत्नागिरी महिला काँग्रेसने कंगनाच्या पुतळ्याला चप्पलचा हार घालून जोडे मारले आणि कंगना राणावत हाय हाय , कंगनाला जोडे मारा , पुरस्कार रद्द करा अशा घोषणा देऊन काँग्रेस भवन परिसर दणाणून सोडला. त्यावेळी काँग्रेसच्या मिडिया प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे , जिल्हाध्यक्ष ॲड आगाशे , तालुका अध्यक्ष रिझवाना शेख ,महिला शहर अध्यक्ष नूतन गोरीवले , सचिव शेहरबानू मोडक , सोनाली खांडेकर , अक्षया खेडेकर इ कार्यकर्त्या उपस्थित होत्या