वनविभागाने अथक प्रयत्न करून ब्लॅक पँथरच्या पिल्लाची व आईची भेट घडवून आणली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील गोवेरी-तेंडोली येथे ११ नोव्हेंबर रोजी दुर्मिळ असणारा ब्लॅक पँथर आढळला हाेताआंबा/काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत पडला होता. अखेर त्याची यशस्वीपणे सुटका करून या ब्लॅक पँथरला त्याच्या आईची भेट घडविण्यात वनविभागाला यश मिळाले हाेतेमादी प्रजातीच्या या ब्लॅक पँथरचे वय सुमारे ८ ते १२ महिने आहे. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा चिफ वाईल्ड लाईफ वॉर्डन महाराष्ट्र राज्य सुनिल लिमये तसेच मुख्य वनसंरक्षक (प्रा.) वनवृत्त कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेट बेन यांचे मार्गदर्शनाखाली त्या बछडयाच्या आईचा शोध घेत पुर्नभेट (Re-Union) करून देण्याचे निश्चित करणेत आले. त्यानुसार उपवनसंरक्षक (प्रा.) वनविभाग सावंतवाडी शहाजी नारनवर यांनी त्यावर निर्णय घेत तशा सुचना वनपरिक्षेत्र कुडाळचे बचाव पथकास दिल्या.12 नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र कुडाळ बचाव पथकाने पुणे येथील या टीमच्या मदतीने कुडाळ वनविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये रेस्क्यु करण्यात आलेल्या मादी बछडयाच्या आईचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याची खात्री होताच ठिक-ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावत त्याच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपण्यास सुरुवात केली.
वनविभागाच्या क्षेत्रात मादी (आईचा) वावर दिसून येताच तिथे बछडा व आई यांची भेट करून देण्याच्या कार्यवाहीला वेग आला. ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले. तत्पूर्वी निरीक्षणाखाली व निगराणीखाली असणाऱ्या बछड्याने पिंजऱ्यात ठेवण्यात आलेल्या कोंबडीला आपले भक्ष्य बनवत तिचे मांस खाल्ल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला.
सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वनपरिक्षेत्र कुडाळ बचाव पथकाने बिबट्याच्या बछड्याची तपासणी करुन त्यांच्या आईचा वावर असलेल्या परिसरात बछड्यास पिंजऱ्यासहीत नेण्यात आले. तिथे पुणे टीमची बिबटयाच्या प्रतिसादाची प्रतिक्षा सुरू झाली. अथक प्रयत्नाने रात्री उशिरा आईने पिंजऱ्यातील आपल्या पिल्लाचा अंदाज घेतला, पण हुलकावणी देत तिथून ती पसार झाली. पिंजऱ्याजवळ येऊन तिने दर्शन दिल्याने बचाव तथकाच्या आशा पल्लवित झाल्या.
पुन्हा जोमाने १३ नोव्हेंबर रोजी सकाळपासून आई व बछडा यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दरम्यान उपवनसंरक्षक (प्रा) वनविभाग सावंतवाडी हे स्वतः रात्री उपस्थित होते. १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४० च्या सुमारास आई पिंजऱ्यातील पिल्लाजवळ येताच पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा पिल्लू आईला बिलगले व आपला उर्वरीत आयुष्याचा आनंदी प्रवास पुनःश्च सुरु करण्यासाठी गेले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button