रत्नागिरी सामाजिक न्याय भवननजिकच्या कुवारबांव येथील विद्यार्थी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा
रत्नागिरी सामाजिक न्याय भवननजिकच्या कुवारबांव येथील विद्यार्थी वसतिगृहामध्ये द्वितीय वर्षातील पॉलिटेक्निक, आयटीआय शिकणार्या आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रथम वर्ष ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यामुळे आता दुसर्या वर्षासाठी परंतु वसतिगृहात प्रथम प्रवेश या विद्यार्थ्यांना हवा आहे.
आयटीआय, पॉलिटेक्निक कॉलेज सुरू होत आहेत. त्यामुळे या वसतिगृहात प्रवेश देताना प्रथम वर्षाला असलेल्या आयटीआय, प्रथम वर्षातील पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सूचना दिल्या जात आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी आयटीआय, पॉलिटेक्निक कॉलेज बंद होती. त्यामुळे रत्नागिरीतील शासकीय वसतिगृहसुद्धा बंद होती. www.konkantoday.com