चिपळूण शहरातील पाग नाका येथील देसाई बाजार परिसरात चोरीची दुचाकी चालविताना दोन तरुण ताब्यात


चिपळूण शहरातील पाग नाका येथील देसाई बाजार परिसरात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविताना चिपळूण पोलिसांनी एका १८ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. तर पाग पॉवर हाऊस ते बहादूरशेख नाका जाणार्‍या सर्व्हिस रोडवर संशयास्पदरीत्या मोटारसायकल घेऊन फिरणार्‍या तरुणास चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची मोटारसायकल जप्त केली. ही कारवाई त्याच दिवशी रात्री सुमारे ८.२० वाजता करण्यात आली.
पोलिसाच्या माहितीनुसार, आरोपी अरमान बशीर अहमद शेख (वय १८, रा. दिहवा सोनी, ता. गोंडा, उत्तर प्रदेश) हा संशयितरित्या मोटारसायकल चालविताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे मोटारसायकलच्या मालकीबाबत कागदपत्रांबाबत चौकशी केली. मात्र, वाहनाच्या मालकीबाबत समाधानकारक स्पष्टीकरण किंवा कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याने पोलिसांनी काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल तसेच (एमएच-१४-एपी-२३३७) जप्त केली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button