
रत्नागिरीच्या वनविभागात कर्मचारी भरतीची खोटी जाहिरात, चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार
रत्नागिरीच्या वनविभागात कर्मचारी भरतीची खोटी जाहिरात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीमुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. अर्ज दाराकडून अर्ज मागविण्यात बरोबर त्याची आर्थिक लूट होऊ शकते हा धोका ओळखून येथील वनविभागाने याप्रकरणी चिपळून पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सांगलीतील एका वृत्तपत्रात याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये रत्नागिरी उपविभागीय वन अधिकारी कार्यालयात वनरक्षक, चालक, डिप्टी रेंजर, फिल्ड ऑफिसर. निरीक्षक या पदासाठी भरती असून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरात देणाऱ्याने आपले दोन मोबाईल क्रमांक जाहिराती मध्ये दिले आहेत अर्जदाराने व्हाट्सअप च्या माध्यमातून आपली कागदपत्रे आणि अर्ज करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाइल्डलाइफ कंट्रोल ब्युरोचे सदस्य पापा पाटील रत्नागिरी वन विभागाशी संपर्क साधून या जाहिरातीची माहिती दिली.
यासंदर्भात रत्नागिरी वन विभागातील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कोणतीही कर्मचारी भरती नाही भरती करायची असेल तर शासनामार्फत त्याची रीतसर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल हे कृत्य कोणी केले माहित नाही असा खुलासा केला. त्यानंतर तातडीने वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित जाहिरात देणार याचा शोध घेण्यास सुरुवात केली पण जाहिरातीमधील मोबाईल क्रमांक हे वारंवार बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर ही फेक जाहिरात आहे हे स्पष्ट झाले यातून लोकांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी वन विभागाने जाहिरात देणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या विरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
www.konkantoday.com