झाडगांव येथील प्रेक्षणीय मत्स्यालय संग्रहालयाची व्यापक प्रसिद्धी व्हावी -पी. डी. यादव
झाडगांव सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रेक्षणीय मत्स्यालय, संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थी, पर्यटक, नागरिकांनी किमान एकदा तरी याला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव यांनी केले आहे. केंद्राचे प्रमुख डॉ. प्रकाश शिनगारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. आसिफ पागारकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. केतन चौधरी, प्रा. डॉ. सुरेश नाईक यांनी केंद्र, मत्स्यालयाचा इतिहास विशद केला. केंद्राने आजपर्यंत केलेले संशोधन, विस्तार शिक्षण, मत्स्यालय सेवा या कार्याची श्री. यादव यांनी स्तुती केली. या कार्याची प्रसिद्धी ग्रामीण भागाकरिता पोहोचण्याकरिता युट्युब, ऑनलाईन कार्यक्रम, सोशल मिडियाचा वापर करावा, असे आवाहन पी. डी. यादव यांनी केले.
www.konkantoday.com