गांधीगिरी करणार्‍या तरुणांचा भाजपच्यावतीने सत्कार

रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांना वैतागलेल्या मुरुगवाडा येथील तरुणांनी गांधीगिरी करीत आठवडा बाजार येथे भर रस्त्यातच खड्ड्यात वृक्षारोपण केले. त्यानंतर जाग आलेल्या रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने तात्काळ २४तासाच्या आतच खड्डे भरण्यास सुरुवात केली. त्यामुळे या तरुणाचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मुरुगवाडा येथील ऋषीराज मोरे आणि मयूर नागवेकर या दोन तरुणांनी केलेल्या आगळ्या वेगळ्या वृक्षारोपणाची सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली त्यामुळे लोकप्रतिनिधींना खडबडून जाग आली आज सकाळी आठवडा बाजार परिसरातील रस्त्याचे खड्डे बुजवायला नव्हे तर रस्त्याचे चक्क डांबरीकरण करण्याला नगरपालिकेने सुरूवात केली आहे त्यामुळे या जागृत तरुणाने दाखवलेल्या गांधीगिरीचा का होईना चांगला परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने ऋषीराज मोरे या तरुणाचा त्याच ठिकाणी सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजप नेते राजेश सावंत, नंदकिशोर चव्हाण, बाबू सुर्वे, ययाती शिवलकर, योगेश हळदवणेकर, अमेय मसुरकर, संजय निवळकर आदी मान्यवर सत्काराला उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button