
करंट तिकिट सेवा सुरू करण्याबरोबरच रेल्वेस्थानकातील आरक्षण खिडक्या वाढवा -शौकत मुकादम यांची मागणी
एस.टी. संपामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेचा आधार मिळावा, यासाठी बंद असलेली करंट तिकिट सेवा सुरू करा. तसेच रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडक्या वाढवा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष तसेच माजी पंचायत समिती सभापती शौकत मुकादम यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
www.konkantoday.com