रत्नागिरीतही एसटी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा सहावा दिवस,एकही बस न सुटल्याने एसटीचा कारभार ठप्प
एसटी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा हा सहावा दिवस आहे आज पर्यंत रत्नागिरी विभागीय कार्यालय तून एकही एसटी बस सुटलेली नाही सर्व कर्मचारी या आंदोलनात सर्व संघटना सहभागी असून 100% एसटी गाड्या बंद आहेत काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केलेली असताना देखील बहुतांश लोक हे आंदोलनात सहभागी आहेत संध्याकाळी विभागीय कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक भजनामध्ये सहभागी होत आहेत तसेच रोज सकाळी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढून आपला एसटी महामंडळाच्या विरुद्ध असलेला रोष प्रकट करत आहेत आज सकाळी जी रांगोळी काढण्यात आली आहे ती एसटी गळफास घेत आहे अशा आशयाची आहे आज पर्यंत ३७ कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत आमच्या प्रतिनिधीने या कर्मचा यांची भेट घेतली असं त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे शासनाने तातडीने मागण्यांबाबत लक्ष घालावे अशी त्यांची मागणी आहे
www.konkantoday.com
पहा हा व्हीडीओ…