
केंद्र सरकारच्या विरोधात १४ ते १९ नोव्हेंबरला जनजागरण सप्ताह अभियान
केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून गरीबांना लुटायचे आणि उद्योगपतींचे खिसे भरायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. याचाच परिणाम म्हणून देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एका बाजूला दरवाढ, महागाई आणि दुसर्या बाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व केंद्राचे शेतकरीविरोधी धोरण यामुळे गरीब, शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशातील जनतेची लूट चालवली असून याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्यावतीने दि. १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण सप्ताह अभियान राबविण्यात येणार असून जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. www.konkantoday.com