
ओणी ते अणुस्कुरा या मार्गावरील एक पूल व दोन मोर्यांची अवस्था धोकादायक
राजापूर तालुक्यातील ओणी ते अणुस्कुरा या सुमारे ३५ कि.मी.च्या संपूर्ण रस्त्याच्या रूंदीकरणासह डांबरीकरण करणे आवश्यक असुन या मार्गावर एक पूल व दोन ठिकाणी मोर्यांचे नव्याने बांधकाम करावे लागणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाला तसा प्रस्ताव करून तो प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे.
यावर्षी कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा फटका आंबा घाटातील वाहतुकीला बसला आणि त्या घाटमार्गे होणारी वाहतूक बंद पडली. दरम्यान, ती वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वाढली. गेल्या तीन, चार महिन्यात तर अणुस्कुरामार्गे सर्व प्रकारची वाहतूक सुरू असून त्यामध्ये अवजड वाहतुकीचा देखील समावेश आहे.
www.konkantoday.com