सावंतवाडी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलीस अजूनही आरोपींच्या शोधात

सावंतवाडी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा तपास निर्णायक वळणावर येऊन थांबला असून काही परस्थीतीजन्य पुरावे पोलीसांना हवे असून पोलीस ठसे तज्ञ व फोरेन्सिक अहवालाचीही मदत घेऊन आरोपी पर्यंत पोचण्याचा विचार करत आहे त्यामुळे पोलीस काहि दिवस थांबून या अहवालाची प्रतिक्षा करत आहेत.मात्र पोलीसांना अद्याप हत्ये मागचे कारण शोधण्यात यश आले नसले तरी संशयित ताब्यात आल्यानंतरच हत्येच्या कारणाचा उघड होईल असा दावा पोलीस करतना दिसत आहेत.सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात दोन वृद्ध महिलांचे हत्याकांड घडून आठवडा उलटून गेला तरी पोलीसांच्या हाती काहिच लागले नाही निलिमा खानविलकर व शालिनी सावंत अशा या वृध्द महिलांच्या हत्याकांडाने सावंतवाडी च नाही तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाच हादरून गेला होता पण पोलीस अद्याप पर्यत हत्येचे कारण शोधण्यातच व्यस्त होते पण अद्याप पर्यत हत्ये मागचे कारण पोलीसांना सापडलेले नाही
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button