
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये अपघात, तिघे जखमी
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील अभिषेक हॉटेलच्या वळणावर दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. यामध्ये तिघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
महादेव ज्योतिराम कांबळे (३१) व प्रकाश लाला बनसोडे (२६, दोघेही रा. आवे, पंढरपूर, जि. सातारा) आणि सहदेव लेट गंभीर जखमींची नावे आहेत. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास गणपतीपुळे येथील अभिषेक हॉटेलच्या वळणावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी महादेव कांबळे व प्रकाश बनसोडे हे दोघे दुचाकीवरून गणपतीपुळे येथील आरेवारे मार्गे रत्नागिरीत येत असताना अभिषेक हॉटेल येथील रस्त्याच्या वळणावर आले असता समोरून सहदेव लेट व नूतन लेट यांच्या दुचाकीबरोबर समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये महादेव, प्रकाश आणि सहदेव हे गंभीर जखमी झाले. नूतन लेट या तरूणाला किरकोळ दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
www.konkantoday.com